यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ टीचर्स ऑर्गनायझेशन (एन. मुक्टो) स्थानिक शाखेच्या नूतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. या प्रसंगी पूर्व कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ. हेमंत भंगाळे यांनी संघटनेचे हेतू, संघटनेचे महत्त्व व यश यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर नूतन कार्यकारिणी अध्यक्षपदी डॉ. आर. डी. पवार यांची एकमुखाने निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
संघटनेचे एन. मुक्टो केंद्रीय प्रतिनिधी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारणीमध्ये संघटनेचे सचिव म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे, सहसचिव म्हणून डॉ. प्रल्हाद पावरा, कोषाध्यक्ष म्हणून डॉ. हेमंत भंगाळे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, सेवानिवृत्त प्रतिनिधी म्हणून प्रा. अर्जुन पाटील तर एन. मुक्टो केंद्रीय प्रतिनिधी म्हणून उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार आदींची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संस्थेचे मानद सचिव श्री निलेश भाऊ भोईटे, दादासाहेब वीरेंद्र भोईटे, डॉ. हेमंत येवले, प्रा. मुकेश येवले आदींनी अभिनंदन केले.