जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जेसीआय जळगाव सेंट्रलची नवीन वर्ष २०२४ ची कार्यकारिणीची निवड एका बैठकीत नुकतीच करण्यात आली. या कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा गुरुवारी ४ जानेवारी रोजी घेण्यात आला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्क्वेअर सर्कलचे सीईओ सतीश मंडोरा, वक्ते नंदलाल गादिया, सीए प्रतीक सारडा, सौरभ गट्टाणी यांची उपस्थिती होती. यावेळी नूतन अध्यक्ष अध्यक्ष सीए वेणुगोपाल बिर्ला, उपाध्यक्ष अभिलाष राठी, सचिव हेमंत आगीवाल यांना पदग्रहण देण्यात आले. कार्यकारिणीत सहसचिव म्हणून सलोनी शाह, कोषाध्यक्ष सीए पारस झंवर, सह कोषाध्यक्ष पीयूष शर्मा यांचीही निवड करण्यात आली आहे.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर सतीश मंडोरा व नंदलाल गादीया यांनी व्यक्तिमत्व विकासाविषयी विविध उदाहरणाद्वारे माहिती दिली. सकारात्मक विचारसरणी व्यक्तिमत्वाला उजळवते असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी पदाधिकारी राजेश शाह, नंदलाल जैसवाल, पंकज धोका, विजय चोपड़ा, प्रसाद झंवर, वेणुगोपाल झंवर, ऋषभ शाह, ज्येष्ठ सदस्य श्याम बिर्ला, संतोष बिर्ला, अशोक राठी, प्रवीण झंवर आदींची उपस्थिती होती.