अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या आंदोलनाची पुढील दिशा आजच्या विशेष बैठकीतून ठरणार आहे.
पाडळसरे धरण युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीनी आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबित आंदोलन व्यापक करण्यासाठी आता अमळनेर,धुळे,पारोळा,चोपडा,धरणगाव,शिंदखेडा या ६ तालुक्यातील आजी माझी लोकप्रतिनिधिंची महत्वपूर्ण बैठक अमळनेर येथे १० मार्च ला बोलविली आहे. लोकप्रतिनिधिच्या सामूहिक प्रयत्नांची सोबत घेऊन आंदोलनाची पुढिल दिशा या बैठकीत ठरविली जाईल. अमळनेर येथिल जुना टाऊन हॉल येथे दुपारी अमळनेर,पारोळा, चोपडा, धरणगाव, धुळे, शिंदखेडा या तालुक्यातील आजी माजी आमदार,खासदार,आजी माजी मंत्री यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. समितीने धरणाच्या कामाबाबत सतत परिसरात चार वर्षांपासून दुष्काळ पडत असतांनाही शासनाच्या उदासिन दृष्टिकोनामुळे धरणाचे काम रखडलेले आहे.त्यामुळे जळगांव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील जनतेचे होणारे अपरिमित नुकसान झालेले आहे.म्हणून या परिसरात संजीवनी ठरणार्या पाडाळसे धरण पूर्ण होण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.
सहा तालुक्यातील जनतेसाठी जनआंदोलन समितीने सुरू केलेल्या प्रयत्नाना कोणते लोकप्रतिनिधी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल. एकंदरीत सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष , दुष्काळाची तिव्रता चौफेर वाढली असतांना लोकप्रतिनिधी राजकारण सोडून किती तळमळीने धरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हजेरी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.