मुक्ताईनगरात नविन कोविड सेंटर; खडसे यांनी दिली वसतीगृहाची जागा

शेअर करा !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील जी.जी. खडसे महाविद्यालयात नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी कॉलेजच्या वसतीगृहाची इमारत दिली आहे.

store advt

मुक्ताईनगर तालुक्यात कोरोना रुग्णांनी द्विशतक पुर्ण केले आहे. मुक्ताईनगर शहरासोबत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. हे रुग्ण आणि क्वारंटाइन केलेले रुग्ण यांना ठेवण्यासाठी प्रशासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह आणि आदिवासी मुलांचे वसतीगृह कोविड सेंटर म्हणुन अधिग्रहित केले होते. परंतु दररोज रुग्ण संख्या वाढत असल्या कारणाने येथिल व्यवस्था अपुर्ण पडत होती. ही बाब लक्षात घेऊन माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील मुलींचे हॉस्टेल कोविड सेंटरला देऊ केले होते. तशी सुचना त्यांनी तहसीलदार यांना केली होती.

या अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या आणि अपुर्ण पडणारी कोविड सेंटरची जागा हि बाब लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने खडसे महाविद्यालयातील मुलींचे हॉस्टेल कोविड सेंटर म्हणुन अधिग्रहित केले आहे. मुलींच्या वस्तीगृहात जवळपास २०० रुग्णांची व्यवस्था झाली आहे. यासाठी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी ने वसतीगृह आणि पलंग कोविड सेंटर ला उपलब्ध करून दिले आहेत. या कोविड सेंटर मध्ये नविन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने कोविड सेंटर साठी उपलब्ध करून दिलेले हे वसतीगृह उंच टेकडीवर असल्या कारणाने पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी नैसर्गिक हवा रुणांना मिळणार आहे.

संस्थेची स्व मालकीची वसतिगृहाची इमारत स्वतः पुढाकार घेऊन कोविड सेंटर ला उपलब्ध करून दिल्या बद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणी ताई खडसे खेवलकर यांचे कौतुक होत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!