कधीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हतो : एकनाथराव खडसे

pawar khadse

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आतापर्यंत पक्षाचे सर्व आदेश पाळत आलोय. त्यामुळे आताही पक्ष देईल तो आदेश मान्य करू. तसेच आपण कधीही पवारांच्या संपर्कात नव्हतो,असे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले आहे. दरम्यान, खडसे यांच्या भाषणमध्येच रोखत कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला.

 

भाजपच्या पहिल्या व दुसऱ्या यादीत नाव नसल्यानंतर एकनाथराव खडसे यांचे तिकीट कापले गेल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज खडसे समर्थकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खडसे यांनी आतापर्यंत पक्षाचे सर्व आदेश पाळत आलोय. त्यामुळे आताही पक्ष देईल तो आदेश मान्य करू, असे म्हटले परंतू समर्थक खडसेंच्या भुमिकेमुळे आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी भाषणात अडथळा आणत अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला.

 

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील एका पत्रकार परिषदेत एकनाथराव खडसे हे मागील तीन महिन्यापासून आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. यावर खडसे यांनी पवार यांचा दावा खोडून काढत आपण कधीही पवारांच्या संपर्कात नव्हतो आणि राहणारही नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, खडसे निवडणूक लढविण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

 

आत्महत्येचा इशारा देणाऱ्या कार्यकर्त्याला केले शांत

एकनाथ खडसे यांनी एका कार्यकर्त्याचाही फोन आला होता. ज्याने तुम्हाला तिकिट मिळाले नसल्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितलं. मात्र खडसे यांनी त्या कार्यकर्त्याला शांत केले. दरम्यान, यामुळे काही वेळ वातावरण कमालीचे तणावग्रस्त झाले होते.

Protected Content