जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकातून ११२ नंबर डायलकरून पोलीसांना विनाकारण त्रास दिल्याप्रकरणी रविवारी २ ऑक्टोबर रोजी एका तरूणावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल अशोक जैन (वय-३३) रा. प्रभात कॉलनी, जळगाव या तरूणाने आकाशवाणी चौकात उभा राहून दारूच्या नशेत रविवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास पोलीस दलाच्या ११२ नंबर डायल केला. ११२ नंबर डायल केल्यानंतर पोलीसांनी मदतीसाठी धाव घेतली. परंतू राहूल जैन याने दारूच्या नशेत नंबरवर डायल करून विनाकारण पोलीसांना त्रास दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस नाईक संतोष सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहूल जैन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.