Home क्राईम रावेरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरपालिकेला निवेदन

रावेरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरपालिकेला निवेदन


रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा वाढता पादुर्भाव लक्षात घेवून रावेर शहरात  निर्जंतूकीकरण करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेला निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना निवेदन दिले आहे. रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वेस्टेशन दरम्यान प्रचंड वर्दळीचे ठिकाण असून कोरोना विषाणूचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता. हा भाग निर्जंतुकरणासाठी फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष महेमुद शेख,कार्यध्यक्ष विलास ताठे,सरचिटणीस ईश्वर निळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


Protected Content

Play sound