मुक्ताईनगर प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आज येथील खासदार संपर्क कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते पंडीत दिनदयाल उपाध्याय आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील कोथळी येथील निवासस्थानी देखील प्रतिमा पुजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.