राष्ट्रवादीचे लक्ष्मण पाटील पूर्णवेळ समाजकारणात उतरणार !

lakshaman patil

धरणगाव, प्रतिनिधी | राजकारणाला राम-राम ठोकून आपण पूर्णपणे समाजकारणात उतरत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील एक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी कळवले आहे. नव्या क्षेत्रात नेमके काय करणार, याबाबत ते येत्या १२ जानेवारीला खुलासा करणार आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डोक्यात हा विचार घोळत होता. तो आता त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय केला आहे. या निर्णयामुळे पक्षाला जरी फार फरक पडणार नसला तरी आपल्यासोबत सतत असलेल्या मित्रपरिवार आणि हितचिंतकांसाठी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्यासोबत एकविचाराने एकत्र येवून समाजकार्य करू इच्छिणाऱ्या मित्रांना सोबत घेवून ते लवकरच नवी वाटचाल सुरु करणार आहेत.

Protected Content