जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अर्बन सेलची नव्याने स्थापना करण्यात आल्याची माहिती आज खासदार वंदना चव्हाण यांनी दिली.
खासदार वंदना चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात अर्बन सेलबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, नागरी भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल हा नव्यानेच स्थापन करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून विविध नागरी समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. राज्यात सध्या २७ महापालिका असून त्यातील बहुतांश समस्या या एकसमान असून यांचे निराकरण या सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.
पहा – खासदार वंदना चव्हाण यांनी दिलेली अर्बन सेलबाबतची माहिती.