मुंबई प्रतिनिधी | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी एका व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना मार्मीक प्रश्न विचारला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन पुकारणार असल्याचा अलीकडेच इशारा दिला आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी एका व्यंगचित्राच्या माध्यमातून अण्णांवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल पंप मगुडमॉर्निंग अण्णाफ बोलतोय तर गॅस सिलेंडर मआमच्यासाठी आंदोलन कधी?फ असा प्रश्न विचारतंय अशा व्यंगात्मकरित्या यात दर्शविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले की, देशात गॅस सिलेंडर, पेंट्रोल-डिझेल दरवाढ झाली पण अण्णा हजारे आंदोलनाला पुढे आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर व्यंगचित्र काढलं. यात पेट्रोल पंप मगुडमॉर्निंग अण्णाफ बोलतोय तर गॅस सिलेंडर मआमच्यासाठी आंदोलन कधी? असं शेजारी बसलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचं दाखवले आहे. अण्णा हजारे यांनी एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही. मात्र राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून चांगलं काम करणार्या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, क्लाईड क्रास्टो यांचे हे व्यंगचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले असून यावरून मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू झाले आहे.
Good Morning अण्णा
आमच्यासाठी आंदोलन कधी ??माझं आर्टवर्क#AnnaHazare #LPGPriceHike #PetrolPriceHike #DieselPriceHike pic.twitter.com/d4V26i8bYL
— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) September 2, 2021