राष्ट्रवादी, काँग्रेससह शिवसेनेला कोर्टाचा दणका

shivsena ncp logo

 

नाशिक प्रतिनिधी । भाजप-शिवसेनेतील मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष शिगेला पोहोचला असून राज्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे विद्यमान 2 आमदार, काँग्रेसचे 2 माजी मंत्री आणि शिवसेनेचा 1 आमदार अडचणीत आले आहे. या नेत्यांना 12 कोटींच्या साखर घोटाळा प्रकरणी कोर्टाने आज दणका दिला आहे.

निफाड साखर कारखान्यात 2007 ला घोटाळा झाला होता. याप्रकरणी तत्कालीन 24 संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या 24 संचालकांमध्ये राष्ट्रवादी विद्यमान आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, काँग्रेसच्या माजी मंत्री शोभा बच्छाव आणि तुकाराम दिघोळे यांचा समावेश आहे. माणिकराव कोकाटे यांनी भाजपमधून बंडखोरी करत लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी कोकाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. मात्र आता कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. एकीकडे, सत्तेच्या स्पर्धेत एक-एक आमदार महत्त्वपूर्ण ठरत असताना कोर्टाने विद्यमान आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

Protected Content