राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यावल शहराध्यक्षपदी अन्सारखान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील अल्पसंख्यांक समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते अन्सार खान निसार खान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या यावल शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या यावल शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद पांडूरंग पाटील यांनी पक्षाचे प्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटन बळकट करण्यासाठी व पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पहोचविण्यासाठी पक्षाच्या यावल शहराध्यक्ष पदासाठी अन्सारखान निसारखान यांची निवड करण्यात आली आहे. अन्सारखान यांच्या निवडीचे यावल तालुका अध्यक्ष तथा यावलचे माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील विजय प्रेमचंद्र पाटील, पक्षाच्या आदिवासी विभागाचे जिल्ह्याचे पदाधिकारी एम. बी. तडवी, पक्षाचे फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, वसंत गजमल पाटील, अरूण लोखंडे, सईदभाई शेख, बापु जासुद यांच्यासह आदी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे .

Protected Content