जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते. असे वक्तव्य केले होते. यावरून भाजपाच्या वतीने राज्यात अजित पवार यांच्या विरोधात निदर्शने केले. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांच्या समर्थनार्थ मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शास्त्री टॉवर चौकात भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने अनेकाच्या भावना दुखावल्या गेल्या. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येवून अजित पवार यांनी जाहीर माफी मागणी अशी मागणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या वक्तव्याला समर्थन देत भाजपा विरोधात जोरदार निदर्शन केल्याचे पहायला मिळत आहे. या अनुषंगाने मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील शास्त्री टॉवर चौकात राज्यपाल आणि भाजपाचे नेत्यांनी महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते झोपले होती का? असा सवाल जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी केला आहे. याप्रसंगी महानगर प्रमुख अशोक लाडवंजरी, महिला आघाडीच्या मंगला पाटील, युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.