Home Cities जळगाव गुलाबराव देवकर यांचा जळगाव शहरात प्रचार

गुलाबराव देवकर यांचा जळगाव शहरात प्रचार


parivartan

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ आज गुलाबराव देवकर यांनी शहरातील कांचन नगर, वाल्मिक नगर, जैनाबाद, डाळफड, लिधुर वाडा, चौघुले प्लाॅट या भागातील काढण्यात आलेल्या प्रचार व संवाद रँलीत मतदारांशी संवाद साधुन समस्या जाणून घेतल्या. शहराच्या सार्वागीण विकासासाठी आता परिवर्तनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मतदारांना केले.

यांनी घेतला सहभाग
या प्रचार रॅलीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, पक्षाचे निरीक्षक करन खलाटे, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी उपमहापौर गणेश बुधो सोनवणे, माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, उज्वल पाटील, बंडू भोळे, सागर सपके, अनिरुद्ध जाधव, रोहन सोनवणे, महिला प्रदेश सरचिटणीस मंगलाताई पाटील, जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगराध्यक्ष निला चौधरी, मिलन पाटील, प्रतिभा शिरसाट, यांच्यासह राष्ट्रवादी आघाडीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते समवेत त्या त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound