जळगाव (प्रतिनिधी) एका किरकोळ कारणावरून राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष नामदेव चौधरी यांनी आपल्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयातील शिपायाने केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयातील शिपाई सतीश चव्हाण यांनी आरोप केला आहे की, कार्यालयातील एका कॅबीनची बेल नसल्याच्या संदर्भात कार्यालयातील बाविस्कर नामक व्यक्तीने महानगरअध्यक्ष नामदेव चौधरी यांना फोन करून विचारणा केली. याचाच राग येत श्री.चौधरी यांनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, त्यानंतर त्यांनी फोन माझ्याकडे द्यायला सांगितला आणि मलाही घाण शिव्या दिल्यात,असा आरोप शिपाई सतीश चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, कार्यालयातील शिपायाला अशा पद्धतीने शिवीगाळ झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.