कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । राज्य सरकारने गडकिल्ल्यांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला असून जनक्षोभामुळे तो मागे घेण्यात आला असून या प्रकाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
याबाबत वृत असे की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी गड,किल्ले भाडे तत्वावर देत असल्याचे सांगितले होते. यावरून जनक्षोभ उसळल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी सरकारने चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आमदार डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल तहसिल कार्यालयात तहसिलदार सौ. अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ. राजेंद्र देसले, तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मनोज पहेलवान, शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलू पहेलवान, किसानसेल तालुकाध्यक्ष रामधन पाटील, नगरसेवक राजेंद्र शिंदे, युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकास साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र पाटील, उमेश पाटील, रोहिदास पाटील,ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील, भाऊसाहेब पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, एन.डी.पाटील पक्षाच्या सर्व फ्रंटलचे पदाधीकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.