पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ हे उद्या गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.
माजी आमदार दिलीप वाघ यांना महाआघाडीतर्फे तिकिट मिळणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांनी मतदारसंघात जोरदार संपर्क मोहिमदेखील सुरू केली आहे. माजी आ. दिलीप वाघ उद्या गुरूवार 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने शहरातील मानसिंगका मैदान, राजीव गांधी टाऊन हॉल समोर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून केले आहे.