सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रीत सदस्य म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सहा मान्यवरांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील सत्तेत जून महिन्यात अजितदादा पवार यांचा गट सत्तारूढ झाल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी विविध शासकीय समित्यांवर नामनिर्देशीत होत आहेत. यातच आज पक्षातर्फे जळगाव जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून सहा जणांची नियुक्ती केली. यात माजी आमदार दिलीप वाघ, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जि.प. गटनेता रवींद्र नाना पाटील, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, चोपडा येथील घनश्याम अग्रवाल आणि एरंडोल येथील डॉ. सुरेश कालेश्वर पाटील यांचा समावेश आहे.
आज राज्य शासनाच्या नियोजन विभागाने या संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. या नवनिर्वाचीत सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार व उमेश नेमाडे तसेच महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.