Home Cities जळगाव खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा- रा.कॉ. महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ

खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा- रा.कॉ. महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ


NCP ryali

जळगाव प्रतिनिधी । मागील लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत ह्याच लोकांनी केवळ आश्वासनांच्या बळावर व धनशक्तीच्या जोरावर जनतेला खोटी स्वप्न दाखवित एक हाती सत्ता मिळविली. मात्र हीच लोक आज रस्ते, पाण्यासह सर्वच बाबतीत जळगावकरांचे हाल करीत आहे. त्यामुळे आता खोटी स्वप्ने व आश्वासने न पाळणाऱ्या भाजपाला सत्तेपासून दुर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीस शहरातून प्रचंड मताधिक्य देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज आपल्या संवाद व प्रचार रॅली द्वारे जळगावकरांना केले.

चित्राताई वाघ याच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील पिंप्राळा भागातील भवानी माता मंदीरात नारळ वाढवित या संवाद व प्रचार रॅलीस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ढोल ताश्यांच्या गजरात निघालेली ही प्रचार रॅली पिंप्राळा भागासह हुडको, खंडेराव नगर इतर उपनगरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वागत तर महिला भगिनींनी औक्षण करत शुभेच्छा दिल्यात. या भागातील सर्व उपनगरात जनतेचा प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार व संवाद रॅलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपांई मित्र पक्ष आघाडीचे नेते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound