राजकीय, राज्य

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिका सोडणार नाही – अभिनेते अमोल कोल्हे

शेअर करा !

वाचन वेळ : 1 मिनिट
1552389328 dr amol
1552389328 dr amol

मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका सोडणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहेत. मात्र आपण संभाजी मालिका सोडणार नसल्याचे अभिनेते डॉ. कोल्हे यांनी स्पष्टोक्ती दिल्याने या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ‘मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील. धन्यवाद!’ असं लिहून त्यांनी मालिका सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे उपनेते असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचं ‘शिवबंधन’ तोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या या जोरदार घडामोडींच्या लक्षात घेता ते मालिकेला रामराम करणार अशी चर्चा होती.


शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*