चाळीसगावात इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेतर्फे निदर्शने

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शिवसेनेतर्फे आज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घोषणाबाजी करून निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. 

देशात पेट्रोल डिझेल व गॅस चे भाव आभाळाला भिडले आहे. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे आर्थिकस्थिती पार कोलमडली आहे. याचा जनतेमध्ये उद्रेक पहायला मिळत असुन ही भाववाढ त्वरित कमी व्हावी. यासाठी आज चाळीसगाव शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावर त्वरित कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशाराही शिवसेनेतर्फे आज देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, भिमराव खलाणे, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, उपतालुका प्रमुख महिला आघाडी सविता कुमावत, सविता सोनवणे, कोमल जाधव, प्रतिभा सोनार सुनीता पवार ,संजय ठाकरे ,सचिन ठाकरे राजेंद्र कुमावत रामेश्वर चौधरी अनिल राठोड मनोज कुमावत जितेंद्र बोदार्डे  रॉकी धामणे, प्रभाकर ओगले, बापु नवले, राजु भालेराव ,ज्ञानेश्वर शिंदे, सचिन ठाकरे , दिलीप पाटील, आधार गायकवाड, सचिन ठाकरे , अनिल कुडे,विठ्ठल जाधव संतोष गायकवाड, दिलीप राठोड, गणेश भवर ,राजू साळुंके ,निलेश गायके ,रामेश्वर चौधरी ,निलेश गुंजाळ ,दिपक गायकवाड ,गौतम सोनवणे ,छोटु आहीरे,सोनू गायकवाड, नंदु गायकवाड, सुभाष राठोड, राहुल गायकवाड,चेतन कुमावत, जिभा चौधरी, सोमनाथ साळुंखे, शाम भवर, शशी मोरे, दर्शन कापडणे, सोमनाथ गायके, सुनिल महाले,साई सोनवणे, किरण कुमावत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content