मुंबई-लाईव्ह ट्रेंड न्युज वृत्तसेवा | वंदे भारत या ट्रेनची लोकप्रियता वाढत आहे. लोकसभा निवडणूक निकालांनंतर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. मुंबई ते कोल्हापुर या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल. ही महाराष्ट्रात चालणारी नववी वंदे भारत ट्रेन आहे.
मुंबईवरुन कोल्हापूरपर्यंत आणि कोल्हापूरवरुन मुंबईपर्यंत ही सेमी हाय स्पीड ट्रेन धावणार आहे.
यामुळे कोल्हापूरमधील अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. मेक इन इंडिया असणारी ही ट्रेन ताशी १६० किमीपर्यंत धावू शकते. परंतु सध्या अनेक मार्गांवर १०० ते १२० प्रतीतास किलोमीटर वेगाने धावत आहेत.