महाराष्ट्र एटीएस प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते यांच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील एटीएस प्रमुखाचे पद रिक्त होते. बुधवारी (19 जून) गृह विभागाकडून एटीएस प्रमुख पदासाठी नवल बजाज यांच्या नियुक्तीचे आदेश दिले.

नवल बजाज हे सीबीआयमध्ये संयुक्त संचालकांच्या पदावर कार्यरत होते. याशिवाय कोळसा घोटाळ्यासारख्या महत्वपूर्ण प्रकरणाच्या तपासही त्यांनी केला होता. वर्ष 1995 बॅचचे पोलीस अधिकारी नवल बजाज केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. ते केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) संयुक्त संचालक होते. याआधी नवल बजाज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सुरक्षा दलाचे महानिरीक्षकाच्या रुपात काम करत होते. याशिवाय राज्याती आर्थिक गुन्हे शाखेत अतिरिक्त अतिरिक्त महासंचालकांच्या पदावरही कार्यरत होते.

नवल बजाज यांनी सीबीआयमध्ये संयुक्त निर्देशकाच्या रुपात कोळसा घोटाळआ प्रकरणाचा तपास केला होता. यानंतर बजाज यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यात आले. लोकसभा आचार संहितेच्या कारणास्तव बजाज यांची नियुक्ती झाली नव्हती. अखेर आता नवल बजाज यांना महाराष्ट्राच्या एटएस प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बजाज यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एटीएस ही पोलिस दलाची विशेष शाखा असून यांच्या माध्यमातून देशातील दहशतवादी कारवायांवर आळा घातला जातो. एटीएस अधिकारी प्रत्येक परिस्थितीत दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यात एक्सपर्ट्स असतात. सदानंद दाते यांनी 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याविरोधात लढा देत अनेकांचे जीव वाचवले होते. सदानंद दाते महाराष्ट्रातील मीरा भायंदर वसई विराराचे पोलीस आयुक्तही होते. याशिवाय दाते सीआरपीएफमध्ये आयजीच्या पदावरही कार्यरत होते. दाते महाराष्ट्रातील पुणे येथे राहणारे आहेत.

Protected Content