पुरनाड फाट्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । केंद्र सरकारने केळी उत्पादकांना दर हेक्टरी अडीच लाख रूपयांची मदत जाहीर करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तालुक्यातील पुरनाड फाटा येथे आंदोलन केले.

मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पुरनाड चौफुली येथे जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. कोरोना मुळे आधीच हाता तोंडाशी आलेला केळी माल हा कवडीमोल भावा मध्ये विकावा लागला आहे. त्यात भर म्हणून सीएमव्ही नावाच्या  व्हायरस मुळे लागवडी खालील केळी पीक पूर्ण पणे उपटून फेकावे लागत आहे. केळी उत्पादक शेतकरी हा दुहेरी आर्थिक संकटा मध्ये सापडला असून त्याचे फार कंबरडे मोडले आहे.

यामुळे सरकारने फक्त पंचनामे करून केळी उत्पादकांच्या तोंडाला पाने न पुसता त्यांना भरीव अशी तात्काळ आर्थिक मदत देऊन केळी उत्पादक शेतकरी वाचवला पाहिजे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी बिल पास करून शेतक़र्‍यांना कचाट्यामध्ये पकडले आहे. ४/५ बड्या उद्योगांच्या हाता मध्ये संपूर्ण शेतकर्यांचा माल देऊन शेतकरी संपवण्याचा घाट हा केंद्र सरकारने घातला आहे. केंद्र सरकारच्या ह्या चुकीच्या निर्णया मुळे शेतकरी हा संपूर्ण हवालदिल होऊन संपून जाईल असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

दरम्यान, केळी उत्पादक शेतकर्‍याला हेक्टरी अडीच लाख ( २५००००)रुपये मदत मिळाली पाहिजे. केळी करपा किट पूर्वरत सुरु झाले पाहिजे. केळी विमा तात्काळ मंजूर झाला पाहिजे.  कापूस  उत्पादक शेतकर्यांना मदत मिळावी. 

शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा. राज्यसभेच्या खासदारांचे निलंबन रद्द झाले पाहिजे. शेती रस्त्यानं साठी स्वतंत्र हेड निर्माण करून आर्थिक तरतूद झाली पाहिजे अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, आंदोलकांनी आपल्या . मागण्याचे निवेदन  मंडळ अधिकारी  मिलिंद बाविस्कर   यांना  दिलेले .  याप्रसंगी पोलीस निरीक्षक शिंदे , उप पोलीस निरीक्षक साळुंके यांची उपस्थिती होती

हे आंदोलन राष्ट्रवादी युवक  जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. पवनराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष यु डी पाटील , किशोर पाटील ( पं. स. सदस्य ), तालुका युवक अध्यक्ष सईद खान, उपाध्यक्ष राजेश ढोले , जिल्हा सरचिटणीस प्रवीण दामोदरे विजय पाटील, शहर अध्यक्ष ऋषिकेश पाटील , दिलीप पाटील , योगेश पाटील , हर्षल पाटील आदी सहभागी झाले होते.

Protected Content