Home Cities यावल राष्ट्रवादी शरद पवार गटाने फोडली शासनाच्या काळे कारनाम्यांची दहीहंडी

राष्ट्रवादी शरद पवार गटाने फोडली शासनाच्या काळे कारनाम्यांची दहीहंडी


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरील भुसावळ टी पॉइंट येथे “महायुती सरकार चे काळे कारनामे” हा कार्यक्रम घेण्यात आला. वाढत्या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबाचे कोडमळलेले आर्थिक नियोजन, महाराष्ट्र अस्मितेवरचा घाव,वाढती गुंडगिरी व गुन्हेगारी वाढता महिला अत्याचार, वाढता भ्रष्टाचार, पेपर फुटीमुळे ढासळलेल्या शैक्षणिक अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, सुशिक्षित बेकारीची व बेरोजगाराची उद्भवलेली समस्या या सगळ्या गोष्टी महायुतीकडून करण्यात आल्या स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या नतदृष्ट सरकारने केवळ समाज-समाजात भांडण लावण्याचे काम केले.

महायुती सरकारच्या या काळा कारनामाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देऊन महायुती सरकारचे काळे कारनाम्यांची दहीहंडी फोडण्यात आली व “महायुती काळे कारणामे” याचे बारा पानांचे पेपर प्रसिद्ध करण्यात येऊन जनसामान्य जनतेस वाचनासाठी वाटप करण्यात आले या कार्यक्रम तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,विजय पाटील, एम बी तडवी, भैय्या नरेंद्र पाटील, पवन पाटील, अॅड कोमलसिंग पाटील,ललित पाटील, बापू जासूद ,नानाजी प्रेमचंद पाटील, अरुण लोखंडे ,कामराज घारू,आरिफ तडवी, मोहसीन खान ,ललित तेली, पितांबर महाजन ,ललित पाटील खेडी ,किशोर माळी ,प्रसन्न पाटील , अय्याज मण्यार ,जाहीद कुरेशी,जुनेद शेख ,शेख इरफान ,विजय साळी, गजानन पाटील,प्रकाश भोसले , यशवंत पाटील, आबिद मोमीन इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.


Protected Content

Play sound