मायावती पुन्हा बसपाच्या अध्यक्षपदी

लखनऊ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मायावती यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. आज २७ ऑगस्ट मंगळवारी रोजी लखनऊ येथील पक्ष कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सतीश मिश्रा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर एकमताने मायावती यांची बसपा प्रमुख निवड करण्यात आली. त्यांना अध्यक्ष होऊन २१ वर्षे झाली आहे.

यानंतर मायावती यांची एकमताने बसपा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मायावती १८ सप्टेंबर २००३ पासून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड दर 5 वर्षांनी होते. मायावतींसोबत बसपचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद दिसले. मायावती यांचे पुतणे आकाश आनंद राष्ट्रीय समन्वयक म्हणून कायम राहणार आहेत. मात्र, त्यांचा दर्जा आणखी वाढला आहे. राष्ट्रीय समन्वयकासोबतच त्यांना ४ निवडणूक राज्यांचे (हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र) प्रभारीही बनवण्यात आले आहे.

 

 

Protected Content