जळगाव प्रतिनिधी । जळगाव ते एरंडोल राष्ट्रीय महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणीसाठी आज शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपूरे यांच्यासह शिवसेनेचे शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री. सिन्ना यांची भेट घेवून यांना निवेदन दिले. यावर सिन्हा यांनी 2 नोव्हेंबर पासून खड्डे बुजण्याच्या कामांना सुरूवात होणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.
काय म्हटले आहे निवेदनात, नागपूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर जिल्ह्यातील जळगाव शहरालगत गिरणा नदी पुलाची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. सदरच्या पुलावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहे. तसेच पुलाच्या आसाऱ्या दिसून पुलाची अवस्था अतिशय निष्कृष्ट झालेली आहे. त्यामुळे या पुलावर कधीही मोठया प्रमाणात दुघर्टना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जळगाव ते एरंडोल हा राष्ट्रीय महामार्ग रस्तानुसार खुड्याचे माहेर घर आहे. त्यामुळे खड्डे चुकवितांना अनेक वाहनांचे अपघात होवून जिवितहानी होत आहे. याकडे प्रशासनातील अधिकारी जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. सदरच्या राष्ट्रीय महामार्गाची निविदा निघाल्याबाबत आम्हाला ज्ञात आहे. पण त्या कामासाठी मोठा कालावधी उलटून ही कामास आजतागायत सुरुवात झालेली दिसत नाही. तरी आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करतो, अजुन काही मोठी दुर्घटना घडणे आधी सदरच्या पुलाची व जळगांव एरडोल दरम्यानच्या महामार्गाची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक व गरजेचे आहे. एक महिन्याच्या आत सुरु न झाल्यास संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून शिवसेना ग्राहक कक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपूरे, जि.प.सदस्य प्रताप पाटील, महिला सदस्या मंगला बारी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.