जळगाव प्रतिनिधी । वैधमापन शास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहरातील लेवा भवन येथे प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास जिल्ह्यातील नागरीकांचा उत्सफुर्ते प्रतिसाद लाभला, अशी माहिती वैध मापन शास्त्राचे सहाय्यक नियंत्रक रा.भ. बांगर यांनी दिली आहे.
या प्रदर्शनात वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत केले जात असलेले कामकाज, ग्राहक जागृतीसाठी माहिती देणारे फलक, वैध मापे व अवैध मापे कशी ओळखावी त्यांचे प्रात्यक्षिक, आवेष्टीत वस्तु घेताना घ्यावयाची काळजी आदि बाबींविषयी माहिती ठेवण्यात आली होती. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना माहितीचे पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या प्रदर्शनास शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्राहक परिषदेतील कार्यकर्ते, वैध मापन यंत्रणेतील परवानाधारक विक्रेते, दुरुस्त्कार व उत्पादक यांचेसह परिसरातील अनेक ग्राहकांनी भेट देवून माहिती करुन घेतली. या प्रदर्शनास भेट देणाऱ्या व्यक्तींना वैध मापन यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत माहिती देण्यात आल्याचे श्री. बांगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.