यावल येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  ग्राहकांना त्यांच्या हक्कासाठी जागरूकत्ता निर्माण करण्यासाठी व ग्राहक संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कासाठीचे प्रचार करणे आणि त्यांना सुरक्षित आणी परवडणारी उत्पादने व सेवा उपलब्ध आहे याची खात्री करणे हे महत्व अधोरेखित करण्याची मिळालेली संधी म्हणजे संपुर्ण देशात साजरा करण्यात येणारे राष्ट्रीय ग्राहक दिन होय आपल्या देशाचे राष्ट्रपती यांनी २४ डिसेंबर १९८४ साली या कायद्याला मंजुरी दिली होती.

या येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकिय ईमारतीच्या सभागृहात दिनांक २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला , तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पुरवठा निरिक्षक अर्चना भगत होत्या.

या वेळी भगत व महसुलचे विविध अधिकारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी अर्चना भगत, मनोज खारे यांनी उपस्थितांना ग्राहकांच्या हक्का बदल मार्गदर्शन केले तर ग्राहकांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडलीत, या कार्यक्रमास पुरवठा विभागाच्या धान्य गोदाम निरक्षक वाय डी पाटील, संजय गांधी निराधार समिती विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे, पुरवठा अधिकारी अर्चना वाघमुळे यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्प दुकानदार, व्यापारी ,गॅस वितरण करणारे दुकानदार व इतर व्यवसायिक आणि नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फैजपुर येथील गणेश गुरव यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार वाय डी पाटील यांनी मानले

Protected Content