यावल प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ‘अर्थशास्त्र व वाणिज्य मंडळा’द्वारे नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला.
यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मर्यादित जळगाव द्वारा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य मंडळाद्वारे नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.ए. पी. पाटील मार्गदर्शक होते तर अध्यक्षस्थानी संजय कदम होते.
प्रा. ए.पी.पाटील यांनी ‘ग्राहकांचे हक्क’ या विषयावर विचार व्यक्त करतांना “ग्राहकांनी जागरूक राहत कोणतीही वस्तू घेताना त्याची पावती घेणे गरजेचे आहे.” असे सांगितले. संजय कदम यांनी बोलतांना, “प्रत्येक सर्वसामान्य ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव असली पाहिजे .” असे सांगितले. राष्ट्रीय ग्राहक दिनाचा हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रसिंग वसावे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन हेमलता बारी यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.