रोहिणी खडसे खेवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा – यावल शिवसेना

यावल प्रतिनिधी | चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी रोहिणी खडसे खेवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंदर्भात यावल शिवसेनेच्या वतीने यावल पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, “दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी चार/साडेचार वाजेच्या सुमारास एका पोर्टलवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे केळकर यांनी आमदारांना मारण्याची भाषा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.

या बातमीत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांना मारण्याची चिथावणीखोर भाषा वापरलेली आहे. त्यामुळे जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या व्यक्तीच्या जीवितास खडसे कुटुंब उठलेलं दिसून येत असून अतिशय वैफल्यग्रस्त झालेल्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.” अशा प्रकारचे निवेदन यावलच्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने यावल पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं आहे.

या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेना शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना आदी. तालुकाध्यक्ष हुसेन तडवी, शिवसेना उपतालुका संघटक पप्पू जोशी, शिवसेना शहर प्रमुख संतोष खर्चे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शिवसेना विभागप्रमुख सारंग बेहडे, कोरपावली शाखाप्रमुख भरत चौधरी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अझहर खाटीक, शिवसेना यावल शहर समन्वयक सागर बोरसे, युवासेना शहरप्रमुख सागर देवांग, शिवसेना उपशहरप्रमुख योगेश पाटील, शिवसेना शाखाप्रमुख शकील पटेल, युवा सेना तालुका सरचिटणीस सचिन कोळी, शिवसेना प्रसिद्धीप्रमुख संतोष वाघ, शिवसेना शहर संघटक सुनील बारी, शिवसैनिक राजू दळवी, शंकर खर्चे आणि मयूर कोळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content