मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे म्हणून शेतीविषयक अभ्यासक्रमासाठी कृषी महाविद्यालय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी अल्पसंख्याक शासकीय तंत्रनिकेतन, बऱ्हाणपूर ते औरंगाबाद हायवे असे अनेक प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आले, असे प्रतिपादन भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी केले आहे. त्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, बेलसवाडी, पातोंडी या गावात प्रचारानिमित्त बोलत होत्या.
याप्रसंगी रावेर लोकसभा संयोजक व जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि प अध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर, रासप जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, पंस सभापती शुभांगी ताई भोलाणे, जि प सदस्य वैशालीताई तायडे, जि प सदस्य निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश दादा ढोले, बोदवड कृ उ बा समिती सभापती निवृत्ती काका पाटील, विधानसभा विस्तारक विलास भाऊ तायडे, माजी सभापती राजू भाऊ माळी, तालुका सरचिटणीस संदीप भाऊ देशमुख, पंस सदस्य विकास पाटील, पंस सदस्य सुवर्णाताई साळुंखे, अंतुर्ली सरपंच विलास पांडे, ताहेर खान, सुनील पाटील, मोहन महाजन, जगदीश महाजन, बेलसवाडी सरपंच शकील खान, विनायक पाटील, विनोद पाटील, कैलास पाटील, पातोंडी सरपंच विकास पाटील, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी भाजयुमो, महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते