आ. गुलाबराव पाटलांच्या पाठपुराव्याने नशिराबादच्या विकास कामांना चालना !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद नगरपालिका हद्दीच्या अंतर्गत डी पी डी सी मार्फ़त विविध कामांसाठी तत्कालीन पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने तब्बल २ कोटी २४ लाख रूपयांच्या विकासकामांना मान्यता मिळाली असून याचे बहुतांश कार्यारंभ निर्देश प्रदान करण्यात आले आहेत.

या कामांमध्ये जिल्हा नियोजन योजनेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेच्या अंतर्गत ३० लाख रूपयांच्या निधीतून उभारण्यात येणारी ग्रंथालयाची इमारत आणि नागरी दलीतेतर वस्ती सुधार योजनेतील पेठ भागातील स्मशानभूमिचे सुशोभीकरण आणि वरच्या आळीत जिम्नॅशियम हॉलच्या बांधकामासह आरसीसी गटारी, पेव्हींग ब्लॉक, कॉंक्रिटीकरण आदी कामांचा समावेश आहे. आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लवकरच या कामांचे विधीवत भूमिपुजन होणार आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद नगरपालिका हद्दीचा चेहरा-मोहरा एका वर्षाच्या आत बदलण्याचे अभिवचन तत्कालीन पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी दिले होते. या अनुषंगाने त्यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात अनेक विकासकामांना चालना मिळालेली आहे. यात अलीकडेच जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेच्या माध्यमातून १ कोटी २९ लक्ष रूपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यात ग्रंथालय, रस्ते कॉंक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, आरसीसी गटारी आदी कामांचा समावेश आहे.

यासोबत जिल्हा नियोजन समितीच्याच अंतर्गत नागरी दलीत्तेतर वस्ती सुधार योजनेतून ९५ लक्ष रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात १३ कामांचा अंतर्भाव असून यामध्ये आरसीसी गटारी, ढापे, रस्ता कॉंक्रिटीकरण, स्मशानभूमि सुशोभीकरण, जिम्नॅशियम हॉल, पेव्हींग ब्लॉक आदी कामांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांमधील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता पूर्ण होऊन संबंधीत कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश अर्थात वर्क ऑर्डर प्रदान करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कामांचे विधीवत उदघाटन करण्यात येणार आहे.

दरम्यान, नशिराबाद शहरातील अस्वच्छतेची आ. गुलाबराव पाटील यांनी दखल घेतली असून संबंधीत अधिकार्‍यांना घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधेसह शहरातील घाणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

या कामांना होणार सुरुवात !

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान मार्फत तत्कालीन पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार नशिराबाद नगरपालिका हद्दीतील 9 कामांना प्कार्यारंभ आदेश देण्यात आले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा प्राप्त होणार आहे . यात न्यू इंग्लिश स्कूल ते स्वामी समर्थ केंद्रा पर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे- 15 लक्ष , बन्सी नाथ यांच्या घरापासून ते वाकी नदी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे -5 लक्ष , लायब्ररी बिल्डिंग ग्रंथालय चे बांधकाम करणे – 30 लक्ष, पेठ भागातील लेवा पंचमढी ते उमाळा रस्ता पर्यंत काँक्रिटीकरण करणें -11 लक्ष, पेठ भागातील रवींद्र पाटील यांचे घर ते स्मशान भूमी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – 12 लक्ष, पेठ भागातील विशाल चौधरी ते उमाळा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे -12 लक्ष, भवानी नगर येथे जगन नाथ ते योगेश माळी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – 9 लक्ष, भवानी नगर हनुमान मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे – 5 लक्ष, तसेच सावतानगर भागातील रस्ता कॉंक्रिटीकरण व आरसीसी गटार बांधकाम करणे -30 लक्ष अशा 9 कामांसाठी 1 कोटी 28 लाख 93 हजार 384 रुपये या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच
डीपीडिसी मार्फत नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत मुक्तेश्वर नगर ते नितीन रंधे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – 8 लक्ष, भवानी नगर येथे सतीश चौधरी ते संदीप सुरवाडे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे – 5 लक्ष, भवानी नगर येथे अशोक माळी ते कमलाकर रंधे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – 3 लक्ष, भवानीनगर येथे बेळी रोड ते उमाकांत वाघ यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – 8 लक्ष, पेठ भागातील स्मशानभूमीची सुशोभिकरण करणे – 5 लक्ष, वरची अळी येथे विजय रंधे ते विजय वाणी यांच्याघरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे – 8 लक्ष, भवानीनगर येथे गोपाळ भारंबे ते दिनेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – 5 लक्ष, वरची अळी येथे जिम्नॅशियम हॉल बांधकाम करणे – 25 लक्ष, मेहमूद झारे यांच्या घरापासून ते अब्दुल्ला बागवान यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे – 3.81 लक्ष, रज्जाक बागवान ते युसुफ बागवान यांच्या घरापर्यंत पेव्हीग ब्लॉक बसविणे – 13 लक्ष, खलील अहमद कयोमोद्दीन यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे – 3 लक्ष तसेच एजाज अली यांच्या घरासमोरील परीसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे – 3 लक्ष, अशा तेरा कामांसाठी 95 लक्ष 11 हजार 440 रुपये प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

सदर विकास कामे मार्गी लागणार असल्यामुळे नशिराबाद वासीयांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Protected Content