ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळातील वेतन न मिळाल्याने येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे खळबळ उडाली असून सर्व कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांचे सुमारे आठ महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. यामुळे विनोद चिरावंडे या ग्रामपंचायत कर्मचार्‍याने मंगळवारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

माजी सरपंच पंकज महाजन व विकास पाटील यांनी कर्मचार्‍यांशी बोलणी केली. तथापि, कर्मचार्‍यांनी पगार मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याचा पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारले. यानंतर विनोद चिरावडे, विकास वाघुळदे, भास्कर माळी, अशोक कावळे, दुर्गादास माळी, सुरेश कावळे, पूनम मर्दाने, जयेश मर्दाने, राजू खटारे, अजय चिंचवडे यांनी मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलिस निरीक्षक नशिराबाद व प्रशासक यांना दिले आहे.

Protected Content