फराळ, कपडे भेट देऊन नारीशक्ती संस्थेने केली आदिवासींची दिवाळी गोड

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील  नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील गरीब महिलांना फराळ, मिठाई, साडी व लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले.

 

आदिवासी‎ पाड्यांवरील गरीब दुर्बल कुटुंबांची‎ दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार चोपडा तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील‎ कुटुंबातील १५० गरजू महिलांना‎ साड्यांसह, मिठाई, फराळ व मुलांना‎ कपड्यांचे वाटप रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी पाड्यावर जावून  करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मनिषा पाटील, सचिव ज्योती राणे, नूतन तासखेडकर, किमया पाटील, संगीता चौधरी , नेहा जगताप, रेणुका हींगु, आशा मौर्य, शशी शर्मा, माधुरी शिंपी, योगिता बाविस्कर, छाया पाटील, भारती कापडणे यांच्या हस्ते दिवाळी फराळ मिठाई व कपडे वाटप करण्यात आले. यासाठी महापौर जयश्री महाजन, उर्मिला सोनी, भारती सोनी, पूर्णिमा देसाई ,उज्वला पाटील पाचोरा ,वर्षा पाटील , अॅड. सीमा जाधव ,डॉ. प्राची महाजन व नारीशक्तीच्या  प्रतिनिधींचे आर्थिक सहकार्य लाभले. तसेच प्रेमराज पवार यांचेही सहकार्य लाभले.

 

Protected Content