मुंबई- विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे हे कार्यालय बंद करण्यात आले आहे.नरहरी झिरवाळ यांनी जनतेला आवाहन केले आहे की, मी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन रहाणार असून, मी स्वतः आपणास भेटणार नाही, पण माझे कार्यालय व कामकाज सुरूच राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. आपण आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर आपले गाव, तालुका,जिल्हा आणि राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगत, त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदार योजनेलाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
झिरवाळ यांनी कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी विनाकारण गर्दी करून नये. कामानिमित्त बाहेर पडल्यास मास्कचा वापर करा. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.