वाराणीस (वृत्तसंस्था) लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्यवाद रॅलीसाठी वाराणसीत आहेत. भाजपसाठी प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा वाराणसी येथे पोहोचले आहेत. यावेळी मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण रस्त्यावर मोदींना पाहण्यासाठी हजारो नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. मोदींच्या जयजयकाराच मोदींवर पुष्प वर्षावही करण्यात येत होता.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रथम काशीविश्वेश्वराचे दर्शन घेत पूजा केली. शिवाय काशीचा कोतवाल असलेल्या कालभैरवाचेही दर्शन घेतले. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी शहरभर सजावट करण्यात आली आहे. यावेळी मोदी यांनी पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचे अंतर ते बंद गाडीतून पार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीविश्वनाथ मंदिरात त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा बरोबर होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, भाजप अध्यक्ष अमित शाह नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर वाराणसीत पंडित दीनदयाल हस्तकला संकुलात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही मोदी संवाद साधला. दरम्यान,नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहराला भगवा रंग देण्यात आला आहे. मोदींचा विश्वनाथ मंदिराकडे जाणारा मार्ग, चौक, नाके आणि भवन झेंडे-फलक आणि भगव्या रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आले होते. काशीचे नागरिक आणि भाजप नेते. कार्यकर्ता ठिकठिकाणी मोदी यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते. मोदींच्या स्वागतासाठी २० क्विंटल गुलाब आणले गेले.