नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा अध्यक्षही भडकले. सभागृहाची प्रतिष्ठा राखा, असं म्हणत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना सुनावले. गेल्या 10 वर्षांच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलणंही मुश्किल झाल्याचं चित्र देशाने पाहिलं. नरेंद्र मोदी सध्या भाषण करत आहेत. मात्र कानाला हेडफोन लावून त्यांना भाषण करावे लागत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला संबोधन केले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करत आहेत. यावेळी विरोधकांनी नीट परिक्षेतील घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरला. यावेळी एनडीए सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करणंही मुश्कील झालं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांना सुनावलं. मात्र तरिही विरोधांची घोषणाबाजी बंद झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोंधळातच आपले भाषण करावं लागत आहे
10 वर्षात आमची सरकार सबका साथ सबका विकास या मंत्रावर काम करत आली आहे. आमच्या सरकारने तुष्टीकरणावर नाही तर संतुष्टीकरणावर काम केले. 10 वर्षात आमचं काम पाहून देशाने आम्हाला 140 कोटी जनतेने आम्हाला संधी दिली आहे. या निवडणूकीत भारतातील जनतेने विवेकतेने मतदान केले. आम्ही विकसित भारतासाठी जनतेचा आशिर्वाद मागितला होता. विकसित देश झाला तर देशातील जनतेचे स्वप्न पूर्ण होतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं आहे.