मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी ट्वि्स्ट आला आहे. अमोल काळे यांच्या अकस्मिक निधनानंतर ही निवडणूक होत आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज न भरण्याचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्यत्व घेतले आहे. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु होती. पण पटोले यांनी शेवटच्या क्षणी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची आज बुधवारी शेवटची तारीख होती.
एमसीए अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांनी आता भूषण पाटील यांना पाठिंबा दिला आहे. भूषण पाटील यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. भूषण पाटील हे काँग्रेसचे नेते असून त्यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. भूषण पाटील यांना अजिंक्य नाईक आणि संजय नाईक यांचे आव्हान आहे. अजिंक्य नाईक हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे जावाई असून एमसीएचे विद्यमान सचिव आहेत. तर संजय नाईक यांना एमसीएमधील प्रभावशाली शरद पवार गटानं पाठिंबा दिलाय.