राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव ते भुसावळ रोडवरील टाटा शोरूमजवळील वैष्णवी फटाके गोडावून समोरील राष्ट्रीय महामार्गावर चालत्या मोठ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागल्याची घटना बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. ही आग कशामुळे लागली ही माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते भुसावळ रोडवरील टाटा शोरूमजवळील वैष्णवी फटाके गोडावून समोरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेलेले आहे. यावेळी भुसावळ कडून जळगावकडे जात असलेला मोठा ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागली. ही आग लागताच चालकाने तातडीने ट्रक जागेवरच थांबविला व ट्रकमधून बाहेर पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

Protected Content