नागपूर वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात लोकाअधिकार मंचातर्फे नागपुरात भव्य रॅली काढण्यात आली. या मोर्चा भाजप आणि आरएसएसनेही सहभाग नोंदविला. भाजपचे बडे नेते या मोर्चात सहभागी झाले. या रॅलीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली.
ही रॅली यशवंत स्टेडिअम ते संविधान चौक इथपर्यंत काढण्यात आली. संविधान चौकात या रॅलीचं रूपांतर सभेत झालं. यावेळी, केंद्रमंत्री नितीन गडकरी यांनी सभेला उपस्थिती दर्शवली.त्याशिवाय, श्री देवनाथ मठाचे पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्र नाथ महाराज, गोविंद गिरी महाराजही सभास्थळी उपस्थित होते.
मुंबईतही समर्थनार्थ मोर्चा
नागपूरसोबतच मुंबईतील घाटकोपरमध्येही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात रॅली काढण्यात आली. अखिल घाटकोपर सिटिझन्स जनसंसदच्या वतीने घाटकोपरमध्ये विशाल मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कायद्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून मोर्चाला सुरवात करण्यात आली. या मोर्चाला शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अखिल घाटकोपर सिटिझन्स जनसंसदने दोन किलोमीटरपर्यंत रॅली काढून मोदी सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा दिला. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह, भाजप नेता प्रविण छेडा उपस्थित, तसेच, प्रविण छेडाचे कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले होते.
देशभरात संतापाची लाट
केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा पारित केला. याचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळाले. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, मालेगावातही मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली. पुण्यात विद्यार्थ्यांनी या कायद्याच्या निषेधार्थ निदर्शनं केली, तर मुंबईच्या आझाद क्रांती मैदानावर बॉलिवूड कलाकार, विद्यार्थी आणि इतर श्रेत्रातील लोकांनी एकत्र येत या कायद्याचा निषेध केला.