नगरदेवळा येथील डाळ महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथे आयोजीत करण्यात आलेल्या डाळ महोत्सवाला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला आहे.

नगरदेवळा येथे अग्नीवंती शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत भव्य असा डाळ महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे उदघाटन तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात ग्रामीण भागातील जनतेसाठी सर्व प्रकारच्या डाळी या होलसेल दरामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. याप्रसंगी किशोरआप्पांच्या हस्ते विधीवत पूजन करून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

जिल्हा कृषी खात्याच्या सहकार्याने अग्नावती शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली असून याच्याच अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात विशेष करून महिलांचा सहभाग असून या माध्यमातून त्यांना आपल्या गावातच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. महोत्सवाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून त्यांचा उत्साह दुणावला आहे. तर, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कंपनीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

कार्यक्रमात संजय पवार आणि कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून स्थापित अग्निवंती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या चेअरमन आणि स्वामी फुड्सच्या प्रोप्रायटर अंजली चव्हाण यांनी पी एम एफ एम योजनेची माहिती देत स्वतःचे व्यवसाय कसा पुढे नेणार याबद्दल सर्वांचे चर्चा केली. अनिल भोकरे सर यांच्या मार्गदर्शनातून आज नगरदेवळा गावात 63 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उनयन योजनेचे फॉर्म भरण्यात आले असून त्यांची प्रक्रिया पुढे चालू असल्याची माहिती दिली.

उद्घाटन प्रसंगी जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, सागर पाटील, सोनू परदेशी, अविनाश कुडे, अनिल चव्हाण, देविदास पाटील, किशोर पाटील, युवा उद्योजक यश चव्हाण हे उपस्थित होते. कंपनीचे संचालक मंडळ किरण राऊळ, मनीषा शिंपी, वैशाली देवरे, प्रतिभा पाटील, सविता पवार, दीपमाला पाटील, योगेश परदेशी, दलपद राजपूत, मालुबाई पाटील आणि गोविंद सिंग राजपूत उपस्थित होते. जास्तीत जास्त महिला आणि ग्राहकांनी या भव्य आणि दिव्य अशा दाल महोत्सवाला भेट देऊन होलसेल दरात खरेदी करावेत असे आवाहन कंपनीच्या सर्व संचालक मंडळाने केले आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अंकंपनीचे संचालक मंडळच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Protected Content