न्यूयॉर्क वृत्तसंस्था । स्पेनच्या रफायल नदालने तब्बल पाच तासांपर्यंत रंगलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत स्पेनच्या रफायल नदाल याने रशियाच्या मेदवेदेवचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात राफेल नदाल आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील लढत चांगलीच रंगली. यात नदालने मेदवेदेवचा ७-५,६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. नदालने २७व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर आतापर्यंत १८ ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. हे नदालचे १९वे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी नदालने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. दरम्यान, ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा डॅनिल मेदवेदेव हा मरात सॅफिननंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.