जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे पुत्र जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या विरोधात मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रताप पाटील यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या आत प्रचार प्रसार करण्यास बंदी असताना प्रताप पाटील यांनी प्रचार केल्याचे आरोप आहे. यावरून गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रताप पाटील यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात या गुन्ह्यामुळे भर पडली आहे. काल सोमवारी 21 रोजी विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वत्र शांतेत मतदान झाले, मात्र जळगाव ग्रामीण मतदारसंघात किरकोळ वाद झाल्याचे प्रकार समोर आले आहे.