कोलंबो वृत्तसंस्था । श्रीलंकेचा दिग्गज आणि फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आता राजकीय मैदानात उतरला आहे. मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजापक्षे यांनी मुरलीधरनची नियुक्ती केली आहे.
राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजापक्षे यांनी स्वत: मुरलीधरनला आमंत्रण पाठवून हे पद स्वीकारण्यास सांगितले होते. मुरलीधरन यांची उत्तर प्रांतासाठी, अनुराधा यहामपाथ यांची पूर्व प्रांतासाठी व तिस्सा विथाराना यांची उत्तर मध्य प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्राध्यक्षांनी परिपत्रक काढून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसात हे तिघ जण राज्यपाल पदांचा पदभार स्वीकारणार आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट घेणारा 47 वर्षीय जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज असलेल्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. मुरलीधरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2010 साली निवृत्ती घेतली आहे.