नई दिल्ली (वृत्तसंस्था) ‘याचा एकच उपाय आहे की, १० हिंदू बांधव एक एकत्रित यांची बहिण आणि आईवर भररस्त्यावर बलात्कार केला पाहिजे. त्यानंतर तिला कापून खांबाला टांगून भर बाजारात टांगून द्यायला पाहिजे. दगडाचे उत्तर दगडानेच द्यावे लागेल’, अशा आशयाची वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर उत्तर प्रदेशातील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्च्याची नेता सुनीता सिंह गौडने टाकली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे भाजपने संबंधित महिलेला पदावरून निलंबित केले आहे.
‘लल्लनटॉप’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटलेय की, सुनीता सिंह गौडने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलेय की, मुस्लीम महिलांचा सन्मान लुटला गेला पाहिजे. कारण भारताची रक्षा करण्याचा अन्य कोणताही मार्ग नाहीय. आता ही पोस्ट फेसबुकवरून काढून टाकण्यात आली आहे. परंतू स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
बीजेपी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया राहटर यांनी गौंड यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देतांना म्हटलेय की, अशा घृणास्पद टिप्पणी सहन केली जाणार नाही. त्यामुळे गौंडला पदावरून निलंबित करण्यात आलेले आहे. प्रेसनोटनुसार गौंडला २७ जून रोजी पदावरून कमी करण्यात आलेले आहे.