मुशर्ऱफ यांची फाशी बेकायदा : लाहोर हायकोर्टाचा निर्णय

parvez musharrf

लाहोर, वृत्तसंस्था | येथील हायकोर्टाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्ऱफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचा निर्णय देत ती रद्द केली आहे. जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने देशद्रोह केल्याचा ठपका ठेवत फाशीची शिक्षा सुनावली होती.

 

या निर्णयाला मुशर्रफ यांनी लाहोरच्या हायकोर्टात आव्हान दिले होते. ज्यानंतर लाहोर हायकोर्टाने ही फाशीची शिक्षा रद्द केली आहे. पत्रकार अब्दुल हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष न्यायलयाने दिलेले इतर आदेशही लाहोर कोर्टाने रद्द केले आहेत. विशेष न्यायालयाने दिलेली शिक्षाच बेकायदा ठरवण्यात आल्याने ती रद्द झाली आहे. असे अतिरिक्त अॅटर्नी जनलर इश्कियात ए खान यांनी म्हटले आहे.

१७ डिसेंबरला पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना देशद्रोही ठरवले. त्यानंतर पाकिस्तानी घटनेनुसार अनुच्छेद सहा अन्वये फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र अनुच्छेद सहा मध्ये करण्यात आलेल्या १८ व्या सुधारणेनंतर हा निर्णय देता येणार नाही, असे लाहोर कोर्टाने म्हटले आहे.
न्यायाधीश मुजाहीर अली नकवी यांच्या नेतृत्त्वात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मुशर्रफ यांच्यासंबंधीचा निर्णय दिला. विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णय अनियमितता आणि विरोधाभास यांचा समावेश आहे. कोर्टाचा निर्णय पूर्वग्रहदुषित आहे, असेही लाहोर हायकोर्टाने म्हटले आहे.

Protected Content