Home क्राईम चोपड्यात ‘त्या’ तरूणाचा खून पूर्व वैमनस्यातून : तीन जणांना अटक !

चोपड्यात ‘त्या’ तरूणाचा खून पूर्व वैमनस्यातून : तीन जणांना अटक !


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने चोपडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप महाजन हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. रविवारी १९ एप्रिल रोजी रात्री प्रदीप हा काहीही न सांगता घरातून निघून गेलेला होता. दरम्यान, रविवारी १९ एप्रिल रोजी रात्री ९ ते सोमवारी २० एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान चोपडा शहरातील धरणाव रोडवरील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत प्रदीपचा मृतदेह मिळून आला होता. ही घटना उघडकीला आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. जुन्या वादातून आणि पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

प्रदीपच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याचे दिसून आले. विजय भास्कर वैद्यकर, निर्मल संजय बडगुजर आणि चेतन सुभाष कांडे तिघे राहणार. चोपडा यांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले. चोपडा शहर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले हे करत आहेत.


Protected Content

Play sound