गाझियाबाद (वृत्तसंस्था) मेहुणीशी लग्न करता यावे म्हणून एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाझियाबादमध्ये राहणारा आरोपी पती आसिफ हा व्यवसायिक असून त्याला मेव्हणीशी लग्न करता यावे म्हणून त्याने पत्नीचा खून करण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने तिघांना पत्नीला मारण्याची २ लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानुसार, घरात दरोडा पडल्याचे दाखवून त्यात पत्नीचा मृत्यू झाल्याचे असिफ भासवले. या हत्येनंतर मुलांचे पालनपोषण कोण करेल यासाठी दुसरे लग्न करण्याचा प्रस्ताव पत्नीच्या घरी ठेवण्याचा आसिफची योजना होती. या द्वारे मुलांच्या आईची कमतरता दूर करण्यासाठी मेव्हणीने आपल्याशी लग्न करावे, असा प्रस्ताव आसिफ देणार होता. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा भंडाफोड झाला.